कर्नाटक सरकारच्या वतीने परिवहन बसचे तिकीट दर 15 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे . बेळगावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे या तिकीट दरवाढीविरोधात आज आंदोलन करण्यात आले.
सोमवारी बेळगावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने . परिवहन बसच्या तिकीट भाड्यात १५ टक्के वाढ करण्याच्या कर्नाटक सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन करण्यात आले.
आधीच शक्ती योजनेमुळे परिवहन बसेसवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. आता हमी योजना व्यवस्थापित करण्यासाठी, परिवहन मंत्र्यांनी बसच्या तिकीट दरात 15% वाढ केली हे निषेधार्ह आहे. बसमध्ये पुरुषांना जागा नाही. बसमधून मोठ्या संख्येने प्रवास करताना होणाऱ्या अपघातांची जबाबदारी परिवहन विभाग घेत नाही.

गरीब रोजंदारी मजुरांच्या कुटुंबावर त्याचा बोजा वाढला आहे. एकीकडे सरकार महिलांना मोफत भाग्य देतंय तर दुसरं पुरुषांकडून हिरावून घेत आहे . सरकारने ही फसवणूक थांबवावी. आधी मंत्र्यांनी परिवहन बसमधून प्रवास करून बघावा असे , अभाविपचे राज्य कार्यकारिणी सदस्य मंजुनाथ हंचीनमणी यांनी सांगितले

शक्ती योजनेमुळे विद्यार्थ्यांना बसने प्रवास करणे अवघड झाले आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये वेळेवर येऊ शकत नाही. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले. शक्ती योजनेला आमचा आता विरोध नाही. मात्र, तिकीट दरात 15 टक्के वाढ झाल्याने सर्वसामान्यांवर बोजा पडतो. बस प्रवासी हे बहुतांशी मध्यमवर्गीय आणि गरीब लोक असतात. अभाविपचे महानगर प्रमुख रोहित अलकुंटे म्हणाले की, दर वाढीमुळे त्यांचे अंदाजपत्रक चुकले आहे आणि ते एक ओझे बनले आहे.
यावेळी अ.भा.वि . प. चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments