सनातन धर्माच्या रक्षणासाठी झगडलेले संभाजी महाराज , जीवापेक्षा धर्म श्रेष्ठ, असे म्हणणारे धर्मवीर संभाजी महाराज त्यांच्या मूर्तीच्या अनावरणावर विरोध करून नये असे विधान परिषद सदस्य सी.टी. रवी म्हणाले .
बेळगावच्या अनगोळमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीच्या अनावरणावर विरोध व्यक्त केला जात आहे, हे दु:खदायक आहे, असे विधान परिषद सदस्य सी.टी. रवी यांनी म्हटले आहे.
व्हिडिओद्वारे केलेल्या एका वक्तव्यात ते म्हणाले, “महात्म्यांना प्रादेशिक दृष्टिकोनातून पाहता कामा नये, त्यांच्या राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सनातन धर्माच्या रक्षणासाठी संघर्ष केला. हिंदवी स्वराज्य स्थापनेचा इतिहास कधीही विसरता येणार नाही. ‘ जीवापेक्षा धर्म श्रेष्ठ आहे,’ असे मानणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी धर्मासाठी प्राणाची आहुती दिली. त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला विरोध होऊ नये,” असे ते म्हणाले.


Recent Comments