चिकमंगळूरचे गौरीगड्डे स्वर्ण पीठिकापूर अवधूत श्री विनय गुरुजी यांचे शुक्रवारी , 10 जानेवारी रोजी बंगळुरू येथून सकाळी 7.30 वाजता बेळगाव विमानतळावर आगमन होणार आहे.
10 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजता बेळगाव येथील हुक्केरी हिरे मठातील गुरुसंस्थेश्वर संस्थान मठाला भेट देतील. सकाळी १० वाजता हुक्केरी हिरेमठ गुरुकुलातील वैदिक विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमात सहभागी होतील. 12 वाजता ते महावीर शैक्षणिक संस्था, हुक्केरी येथे भेट देतील. दुपारी दोन वाजता हुक्केरी येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला भेट देतील. गुरुशांतेश्वर हायस्कूलच्या प्रांगणात दुपारी 4 वाजता होणाऱ्या 2025 हुक्केरी महोत्सवात सहभागी होऊन यश मिळविणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
11 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अथणी शिवयोगींच्या गदगेचे दर्शन होणार आहे. सकाळी 10 वाजता अथणी मोटगीमठ शताब्दी महोत्सवात सहभागी होणार आहेत. सायंकाळी 6.00 वाजता ते बेळगाव विमानतळावरून बंगळुरूकडे प्रयाण करतील. अशी माहिती विश्वस्त अरुणकुमार एच.के. यांनी दिली .


Recent Comments