Belagavi

बेळगावच्या कोल्हापूर सर्कलला लुई ब्रेलचे नाव द्या : श्री अल्लम प्रभू स्वामीजींचा आग्रह

Share

लुई ब्रेल यांची 216 वी जयंती व लुई ब्रेलच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण बेळगाव जिल्हा अंध सेवा संस्थेच्या माहेश्वरी शाळेतील अंध मुलांच्या शाळेमध्ये पार पडले.

लुई ब्रेल यांची 216 वी जयंती आणि लुई ब्रेलच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण शनिवारी बेळगाव जिल्हा अंध सेवा संस्थेच्या माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेत आयोजित करण्यात आले होते. नागनूर रुद्राक्षी मठाचे श्री डॉ. अल्लम प्रभू महास्वामीजी यांच्या दिव्य उपस्थितीत झालेल्या या समारंभात बेळगाव उत्तरचे आ . आसिफ सेठ प्रमुख पाहुणे तर बापू खाडे व्याख्याते म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी बीडीएबीचे अध्यक्ष वादिराज कलघटगी होते.

यावेळी नागनूर रुद्राक्षी मठाचे अध्यक्ष श्री . अल्लम प्रभू महास्वामीजी म्हणाले कि , तुमच्या घरी झालेल्या सोहळ्याने तुमच्या सर्वांच्या मनात घर केले आहे. लुईने 100 वर्षांपूर्वी केलेली क्रांती आदर्श आहे. माजी विद्यार्थी त्यांच्या कार्याच्या स्मरणार्थ कास्य पुतळ्याचे अनावरण करत आहेत हे कौतुकास्पद आहे. लुई यांचा ब्राँझचा पुतळा फक्त बंगलोर, कर्नाटकात आहे .

आता दुसरा पुतळा बेळगावात प्रतिष्ठापित करण्यात आला आहे. कर्नाटकच्या इतिहासात स्मरणात राहणारी ही गोष्ट असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर लुई ब्रेल यांचे नाव अजरामर करण्यासाठी शहरातील कोल्हापूर सर्कलला लुई ब्रेल यांचे नाव द्यावे, अशी विनंती आमदार आसिफ सेठ यांनी केली. बा

यावेळी जयनंद टोपुगोल, डॉ. बसैया मठपती , इरन्ना बडिगेर, शारदा नागमोती , फकिराप्पा हुली, प्रवीण भंडारी आदींचा सहभाग होता.

Tags: