बेंगळूरमधील डिनर पार्टी बद्दल प्रतिक्रिया देताना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, त्या ठिकाणी फक्त पक्ष संघटना आणि 2028 मध्ये परत काँग्रेस सरकार स्थापनेसाठी चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री बदलाबाबत काहीही चर्चा झालेली नाही. एग्रीमेंटबद्दल काहीही कल्पना नाही. आम्ही त्यापासून खूप दूर आहोत, असे ते म्हणाले.
आज त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना सतीश जारकीहोळी म्हणाले, “बेंगळुरूतील आमच्या घरी रात्री डिनर पार्टीच्या संदर्भात चर्चा करताना मुख्यमंत्री आमच्या घरी आले हे काही नवीन नाही. आम्ही सर्वांनी त्यांच्या घरी जाऊन नवीन वर्ष साजरे केले. 2028 मध्ये सरकार आणण्यासाठी राजकारण आणि संघटना यावर चर्चा झाली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री बदलाबाबत कोणताही करार झाल्याचे आम्हाला माहीत नाही. एकाकडे एकच पद आहे.
एका व्यक्तीला दोन पदे दिल्याची उदाहरणे आहेत. अशी उदाहरणे आहेत जिथे क्षमता आणि गरज असताना दोन पदे दिली जातात. आम्ही पक्षाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. डिनर पार्टीत केपीसीसीच्या अध्यक्षपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. सध्या डीकेशी अध्यक्ष आहेत. वेळ आल्यावर यावर चर्चा करू, असे ते म्हणाले.
काँग्रेसच्या अधिवेशनात कोणाचीही अवहेलना झालेली नाही. आमच्यावर सोपवलेले काम आम्ही केले आहे. जिल्हाध्यक्षपदावर काहीही विवाद नाही. एकच नाव आम्ही काढले आहे आणि जिल्हाध्यक्षाच्या नियुक्तीवर कोणताही विरोध नाही. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एकच नाव प्रस्तावित केले आहे,” असेही त्यांनी सांगितले.
बेळगाव महापालिका प्रशासनाबद्दल बोलताना, “कर वसुलीसाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे,” असे ते म्हणाले.


Recent Comments