सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. भारतातील महिलांनी रोज त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे. सावित्रीबाई फुले ह्याच महिलांना साक्षर बनवणाऱ्या खऱ्या दैवत असल्याचे मत बेळगावचे जिल्हा पालक तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती आज बेळगावात विविध दलित संघटनांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. शहरातील डॉ. बी.आर. आंबेडकर उद्यानात आयोजित कार्यक्रमापूर्वी मंत्री सतीश जारकीहोळी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

नंतर व्यासपीठावरून बोलताना , मंत्री सतीश जारकीहोळी यांनी , सावित्रीबाई फुले यांची विचारधारा समजून घेतली पाहिजे. सावित्रीबाई यांनी महिलांनी समाजात प्रगती करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. .डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाने दिलेला अधिकार आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श ठेवत समाजात आता पीडित लोक पुढे आले आहेत.

उच्च पदे सुशोभित करण्याची इच्छा कायम ठेवावी. संविधान बदलण्याचे अनेक प्रयत्न होत आहेत. मात्र, संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी संघटित व्हावे. संविधान बदलले की पूर्वीची परिस्थिती पूर्ववत होईल. प्रत्येक महिलांनी सावित्रीबाई फुले यांची रोज पूजा करावी. सावित्रीबाई फुले हीच खरी देवता ज्यांनी स्त्रियांना साक्षर बनवले असे ते म्हणाले . तत्पूर्वी डॉ.विद्याश्री गिरेप्पा कोलकार यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य व आदर्श सांगितले.

यावेळी शासकीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बसवराज रायव्वगोळ , दलित नेते मल्लेश चौघुले आदी उपस्थित होते.


Recent Comments