हिरेबागेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोंडसकोप्प क्रॉसजवळ राष्ट्रीय महामार्गावर हायवे पेट्रोलिंग वर असलेल्या पोलिस वाहनाला कंटेनरने मागून धक्का दिल्यामुळे दोन पोलिस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.
हिरेबागेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोंडसकोप्प क्रॉस जवळ राष्ट्रीय महामार्गावर हायवे पेट्रोलिंगवरील एर्टिगा कारला मागून कंटेनर वाहनाने धडक दिली. या धडकेत पोलिस ठाण्याचे अधिकारी असलेले एएसआय बी. एस. नागणवर आणि एपीसी बर्की गंभीरपणे जखमी झाले आहेत. सध्या दोघांनाही बेळगावच्या येथील केएलई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .

धडक देणारा कंटेनर वाहन चालकाचे नाव बरकत अली अन्सारी असून , तो उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील रहिवासी आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने तपासणी सुरू केली असून, कंटेनर चालकाच्या विरोधात योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


Recent Comments