धारवाडच्या बाह्यवळणावर नवलगुंद रोडवरील गोवनकोप्प जवळ एका व्यक्तीच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्याच्याजवळील 1 लाख 80 हजार रुपये लुटल्याची घटना घडली आहे. कर्जाची रक्कम घेऊन दुचाकीवरून घरी जाणाऱ्या दुचाकीस्वाराला लुटण्यात आले आहे .
धारवाड शहरातील शिवाजी चौकाजवळ गॅरेज चालवणाऱ्या आदिल मस्तानवाले नावाच्या व्यक्तीला बँकेकडून लोन मिळाल्यानंतर तो घराच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी तीन जणांच्या टोळक्याने त्याची दुचाकी अडवून त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्याच्याजवळील 1 लाख 80 हजारांची रक्कम लुटून नेली .
धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे .


Recent Comments