नुकत्याच मालवण येथील चिवला बीच येथे सिंधुदुर्ग जलतरण संघटना आयोजित चौदाव्या आंतरराज्य ओपन सागरी जलतरण स्पर्धेत आबा व हिंद क्लबच्या जलतरणपटुनी या स्पर्धेत भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली.
कुमार स्मरण मंगळूरकर याने पाच किलोमीटर मध्ये सुवर्ण पदकासहित फास्टेस्ट जलतरणपटू हा बहुमान संपादन केला. या स्पर्धेत पंधराशेहून अधिक जलतरणपटूंनी विविध राज्यातून भाग घेतला होता.
कुमार आदी शिरसाठ याने तीन किलोमीटर व कुमार हर्षवर्धन कर्लेकर पाचशे मीटर यांनी आपल्या गटात प्रथम क्रमांकासह सुवर्णपदके संपादन केली. कुमार भरत पाटील दोन किलोमीटर मध्ये द्वितीय क्रमांक, कुमारी निधी मुचंडी दोन किलोमीटर मध्ये द्वितीय क्रमांक, कुमार ओम जुवळी स्पेशल कॅटेगिरी तृतीय क्रमांक, कुमारी अमूल्ल्या केस्तीकर एक किलोमीटर चौथा क्रमांक, श्री कलाप्पा पाटील दोन किलोमीटर पाचवा क्रमांक, कुमार तनुज सिंग व कुमारी धनवी बर्डे पाच किलोमीटर मध्ये सातवा क्रमांक मिळवला. विजेत्या सर्व जलतरणपटूंना सिंधुदुर्ग जलतरण संस्थेतर्फे रोख रक्कम प्रशस्तीपत्र मेडल व ट्रॉफी देऊन सन्मानित केले.
वरील सर्व जलतरणपटू हे कार्पोरेशन जलतरण तलाव गोवावेस व हिंद सोशल जलतरण तलाव हिंदवाडी येथे नियमित सराव करत असून त्यांना जलतरण प्रशिक्षक श्री विश्वास पवार अमित जाधव रणजीत पाटील यांचे मार्गदर्शन तर क्लबचे पदाधिकारी एड. मोहन सप्रे श्री अरविंद संगोळी श्री शितल हुलबत्ते, सौ शुभांगी मंगळूरकर यांचे प्रोत्साहन लागते.


Recent Comments