Belagavi

अनगोळमधील संभाजी महाराजांची मूर्ती अनावरण कार्यक्रम पुढे ढकलला: शंभू भक्तांचा विरोध

Share

बेळगाव शहरातील अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्ती अनावरण आणि समाज भवन उद्घाटन कार्यक्रम गोंधळात अडकला आहे. एका बाजूला, गावकऱ्यांनी सर्व तयारी पूर्ण करून अनावरण समारंभाला सुरुवात करण्यासाठी पालिकेला वाव दिला, तर दुसऱ्या बाजूला महापौर आणि उपमहापौर यांच्या उपस्थितीत आज केवळ वास्तुशांती कार्यक्रम पार पडला.

बेळगाव महापालिकेस भेट देऊन महापौर आणि आयुक्तांना निवेदन देणाऱ्या अनगोळच्या शंभू भक्तांनी, अनगोळ चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य मूर्तीचे अनावरण घाईगडबडीने केले जात आहे, असे सांगितले. तथापि, या अनावरणाच्या तयारीला पूर्ण वेळ मिळावा म्हणून ५ जानेवारी पर्यंत वेळ द्यावा, अशी त्यांनी विनंती केली. रात्री झालेल्या पंचायतीच्या बैठकीतही याच निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आज त्या ठिकाणी वास्तुशांती कार्यक्रम पार पडला. मात्र, तेथे कामे अपूर्ण होती.

यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान होतो, असे शंभू भक्तांनी सांगितले. यापूर्वी ४-५ वेळा अनावरणाच्या तारीख जाहीर झाल्या होत्या. मूर्ती अनावरणाला आमचा विरोध नाही, पण गावकऱ्यांनी ठरवलेल्या आणि निश्चित केलेल्या तारखेला कामे पूर्ण करून मूर्तीचे अनावरण करणे आवश्यक आहे, अशी त्यांनी मागणी केली.

महापौर सविता कांबळे यांनी सांगितले की, आज केवळ समाज भवनाच्या वास्तुशांतीची पूजा केली जात आहे. सर्व कामे पूर्ण झाली आहेत. घाईघडबडीत कोणतीही कामे केली जात नाहीत. सर्वांना माहिती देण्यात आली आहे. मूर्ती अनावरण समारंभ ५ जानेवारी रोजी होईल, असे त्यांनी सांगितले.

उपमहापौर आनंद चव्हाण यांनी सांगितले की, ५ जानेवारी रोजीच संभाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण होईल. आज चांगला दिवस असल्याने फक्त वास्तुशांतीचे कार्य पार पडले असून, ५ जानेवारीला उद्घाटन होईल.

Tags: