Belagavi

बेळगावच्या मल्लांनी राष्ट्रीय पातळीवर ठोकली विजयाची झंकार…

Share

जिल्ह्यातील युवापिढीला प्रेरणादायी ठरणारे असे अनेक युवा आहेत, जो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाने आपल्या गावाची, जिल्ह्याची आणि राज्याची प्रतिमा उंचावतात. बेळगाव येथील कंग्राळी खुर्द येथील प्रेम लक्ष्मण जाधव आणि कुमारी कल्याणी परशराम पाटील यांचे यश आपल्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

प्रेम जाधवने तामिळनाडू येथे आयोजित दक्षिण विभागीय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कर्नाटकचे प्रतिनिधित्व करत 125 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. तर, कल्याणी पाटीलने महिलांच्या विभागात 59 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. यामध्ये विविध राज्यांतील प्रतिष्ठित मल्लांचा सहभाग होता,

परंतु बेळगावच्या या युवकांनी आपल्या कौशल्याने लक्ष वेधून घेतले. प्रेम जाधव याला कुस्ती क्षेत्रात मार्गदर्शन देणारे प्रमुख मार्गदर्शक म्हणजे वस्ताद काशीराम पाटील, तसेच एनआयएस प्रशिक्षक प्रशांत पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं आहे. याचप्रमाणे कल्याणी पाटील देखील कुस्ती क्षेत्रात अचूक तालमीतून घडत आहे.

तामिळनाडू येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेल्या यशानंतर बेळगाव रेल्वे स्थानकावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. प्रेम जाधव आणि कल्याणी पाटील यांच्या यशाबद्दल गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे अभिनंदन केले. यामुळे त्यांच्या संघर्षाची आणि चिकाटीची झलक समोर आली आहे.

सर्वसामान्यपणे युवा मल्लांचे राष्ट्रीय स्तरावर यश हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे, जे पुढील पिढीला हिम्मत आणि मार्गदर्शन देणारे आहे. राष्ट्रीय पातळीवर सुयश मिळवणाऱ्या बेळगाव रेल्वे स्थानकावरील स्वागताप्रसंगी प्रेमचे वडील लक्ष्मण भावकाना जाधव, आई रूपा लक्ष्‍मण जाधव, कल्याणीचे वडील परशराम पाटील, आई सुजाता परशराम पाटील, कंग्राळी खुर्द येथील ग्रा. पं. सदस्य तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

Tags: