Belagavi

मंत्री प्रियांक खर्गे यांच्या राजीनाम्याची गरज नाही : मंत्री सतीश जारकीहोळी

Share

प्रियांक खर्गे यांचं नाव डेथनोटमध्ये नाही त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची गरज नाही असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

त्यांनी आज बेळगावमध्ये बैठक घेतली आणि पत्रकारांशी संवाद साधला. कंत्राटदार सचिनच्या आत्महत्येच्या प्रकरणात मंत्री प्रियांक खर्गे यांचं नाव डेथनोटमध्ये नाही. त्यामुळे त्यांची राजीनामा मागणी योग्य नाही, असं त्यांनी सांगितलं. हे प्रकरण वेगळं आहे आणि यावर स्वतंत्र चौकशी सुरू आहे. मंत्री प्रियांक खर्गे यांचं मंत्रिमंडळात राहण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

बेळगाव ग्रामीण भागात महिलांच्या नेतृत्वाखाली मायक्रो फायनान्स कर्ज देऊन गंडा घालणाऱ्या प्रकरणात एकाला अटक झाली असून, अन्य दोन लोकांची चौकशी सुरू आहे. तीन पोलिस अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. साधारणतः 100 कोटी रुपयांचे 15 हजार लोकांना 40 फायनान्स कंपन्यांनी कर्ज दिले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे. यामध्ये काही महिलांचा सहभाग असून, सबसिडी देण्याचे सांगून कर्जदारांची सही घेऊन गंडा घालण्यात आला आहे. कर्ज घेतलेल्या व्यक्तींच्या खात्यात आलेला पैसा तिसऱ्या व्यक्तीच्या खात्यात कसा वर्ग केला जातो, याचा तपास सुरू आहे. तपास पूर्ण होईपर्यंत कोणालाही त्रास दिला जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

बेळगाव शहरात सुक्या आणि ओल्या कचऱ्याची वेगवेगळ्या ठिकाणी विल्हेवाट लावण्याची एकच सुविधा आहे. त्यामुळे शहरातील चार ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याची गरज आहे, असं सतीश जारकीहोळी यांनी सांगितलं.

Tags: