शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारादरम्यान बेळगाव शहराच्या रविवार पेठ भागासह बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून यामुळे नागरिक रहदारी विभागाच्या अकार्यक्षमतेवर संताप व्यक्त करत आहेत.
शनिवारी आठवडी बाजारामुळे बेळगाव शहराच्या रविवारी पेठ भागात नियमित वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. बाजारपेठेतील मुख्य मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, परंतु नियोजन नसल्याने वाहन चालवणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.

रविवारी पेठेत रहदारी पोलिस नसल्यामुळे वाहन कोंडी नियंत्रित होण्याऐवजी वाढते आहे. शनिवारच्या आठवडी बाजारात परगावातील अनेक नागरिक खरेदीसाठी येतात. तसेच अवजड वाहनांची मोठी रहदारी असते. विशेषतः बसवेश्वर बँक समोर असणाऱ्या मुख्य वाहतूक केंद्रानजीक वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलिसांची उपस्थिती दिसत नाही.
शनिवारी होणाऱ्या बाजाराच्या दिवशी येथील वाहतूक व्यवस्थेसाठी रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी होत असून सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.


Recent Comments