Belagavi

बेळगावमधील काँग्रेस अधिवेशन रद्द… भव्य मंच आणि बॅनर हटवले…

Share

बेळगावमध्ये होऊ घातलेले ऐतिहासिक राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे रद्द करण्यात आले आहे. यामुळे शहरातील प्रमुख चौकांमध्ये लावलेले मोठे बॅनर आणि काँग्रेसचे ध्वज हटविण्यात आले आहेत. सीपीएड मैदानात उभारलेला भव्य मंचही शनिवारी हटवण्यात आला.

राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सवाचे आयोजन मोठ्या जल्लोषात करण्याचे नियोजन होते. मात्र, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या आकस्मिक निधनामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. यामुळे सीपीएड मैदानात उभारलेला भव्य मंच आणि सजावट हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. शहरातील रस्ते, चौकांमध्ये लावलेले काँग्रेसचे बॅनर आणि ध्वज हटवण्यात येत आहेत. तसेच शहरातील काँग्रेस नेत्यांचे स्वागत करणारे फ्लेक्स आणि गेट्स काढून टाकण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शहरात झगमगाट करणारी लाईटिंग आता बंद करण्यात आली आहे. काँग्रेस अधिवेशनासाठी केलेली सजावट आणि फ्लेक्स हटवण्याचे काम शनिवारी पूर्ण करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या निर्णयाला पाठिंबा दर्शवून कार्यक्रमातील साहित्य काढण्यासाठी मदत केली आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षात शोककळा पसरली आहे. अधिवेशन रद्द करून काँग्रेसने आपल्या ज्येष्ठ नेत्याला आदरांजली अर्पण केली असून, त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

Tags: