उद्या 29 डिसेंबर रोजी होणाऱ्या बेळगावातील श्री बसवेश्वर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विद्यमान पॅनलला पाठिंबा देण्याची मागणी बँकेचे अध्यक्ष रमेश कळसण्णवर यांनी केली आहे.
आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, उद्या रविवार, 29 डिसेंबर रोजी बेळगावच्या कॅम्प येथील इस्लामीया स्कूलमध्ये श्री बसवेश्वर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाची निवडणूक होईल. गेल्या 5 वर्षांपासून याच विद्यमान पॅनलला पाठिंबा देऊन बँकेच्या कार्यात सहकार्य केल्याबद्दल आम्ही ग्राहकांचे आभारी आहोत. शिक्षण, व्यापार, घर खरेदी तसेच विविध कर्जांच्या बाबतीत ग्राहकांना आर्थिक सहाय्य देण्याचे काम केले असून, समाजाच्या उत्कर्षासाठी श्री बसवेश्वर को-ऑपरेटिव्ह बँकने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
ग्राहकांच्या विश्वासामुळे, डिजिटल सेवांसह नवीन सेवांची सुरूवात करण्याचे उद्दिष्ट असून, याच विद्यमान पॅनलला पुढे जाऊन अधिक सेवा देण्याचा संधी दिली पाहिजे, असे अध्यक्ष रमेश कळसण्णवर यांनी सांगितले.


Recent Comments