Belagavi

“तो” शब्द वापरला नसेल तर मंदिरात येऊन “शपथ” घ्या…

Share

सीटी रवी हे आपण तो शब्द वापरला नाही. असे सांगत , लोकांच्या डोळ्यात धूळफेक करून त्यांना वळविण्याचा प्रयत्न करत आहेत . धर्मस्थळ हे धर्माचे दुसरे नाव आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, जर तुमच्यात नैतिकता असेल तर तुम्ही कुटुंबासह या आणि धर्मस्थळच्या श्री मंजुनाथ देवाची शपथ घ्या, मी सुद्धा माझ्या कुटुंबासह येईन.

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या कि , , हे आव्हान नाही, मला त्यांच्याकडून उत्तर नको आहे; मला वाईट मनाच्या माणसाकडून उत्तर नको आहे. मात्र लोकांच्या डोळ्यात धूळफेक करून , जनतेला वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांकडे वळविण्याचे काम ते करत आहेत. तुमचा देवावर खूप विश्वास आहे का धर्मस्थळ तुमच्या गावाच्या अगदी जवळ आहे. धर्मस्थळ हे संपूर्ण देशाच्या लोकधर्माचे दुसरे नाव आहे, जर तुम्ही मंजुनाथ देवाची शपथ घेत असाल तर तुम्ही त्याठिकाणी या. जर तुम्ही तो शब्द वापरला नसेल तर धर्मस्थळाच्या श्री मंजुनाथासमोर येऊन शपथ घ्या.

Tags: