धारवाड जिल्ह्यातील कलघटगी तालुक्यात हिरेहोन्नळी परिसरात झालेल्या कार अपघातात एकाचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले आहेत. विवाह उरकून घरी परतताना हा अपघात झाला.
धारवाड जिल्ह्यातील कलघटगी तालुक्यात हिरेहोन्नळी परिसरात काल रात्री उशिरा भीषण अपघात झाला. कार चालवणाऱ्या चालकाचा ताबा सुटल्यामुळे वाहन रस्त्यालगतच्या झाडावर धडकले. या अपघातात धारवाड येथील अरुण सिंग या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर इतर पाच जण जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये एका व्यक्तीची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती आहे. जखमींवर धारवाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना घडली, तेव्हा कारवार येथून विवाह सोहळा आटोपून सर्वजण धारवाडकडे परतत होते. अपघातामुळे अरुण सिंग गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू पावला.
घटनेची माहिती मिळताच कलघटगी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातस्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.


Recent Comments