Chikkodi

अमित शहा यांनी डॉ. आंबेडकरांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ चिक्कोडी येथे निदर्शने

Share

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी , संसदेत डॉ . बी. आर. आंबेडकरांचा अपमान केल्याचा निषेध करत चिक्कोडी येथे विविध दलित समर्थक संघटना आणि एसडीपीआय संघटनेच्या वतीने आज जोरदार निदर्शने करण्यात आली.

अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करीत तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर केले. हे आंदोलन भीम नगर येथून सुरू झाले आणि अंकलीकूटमार्गे बसवेश्वर सर्कलपर्यंत गेले आणि त्यांनी बसवेश्वर सर्कलमध्ये मानवी साखळी करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

याच प्रसंगी दलित नेते रावसाहेब फकिरे यांनी उपस्थितांना संबोधीत केले . तें म्हणाले कि , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बी. आर. आंबेडकरांचा अपमान होईल अशा पद्धतीने बोलणे खरोखरच निंदनीय आहे. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

यावेळी महावीर मोहिते, गणेश मोहिते, अशोक भंडारकर, सुदर्शन तम्मनवर, बाबू खट्टे, मारुती कांबळे, विनोद चितळे, राघवेंद्र सनदी, विठ्ठल रायमाने, विक्रम शिंगाडे, सुजाता कांबळे, एमआर मुन्नोलकर , श्रीनाथ खट्टी आदी उपस्थित होते.

Tags: