Dharwad

धारवाड मध्ये तीन वाहनांचा अपघात; दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

Share

अशोक लेलँड मिनी गुड्स वाहन , कार आणि बाईक यांच्यात अपघात अपघात होऊन , या अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे .

धारवाडच्या तेजस्वी नगरात रविवारी रात्री तीन वाहनांमध्ये अपघात झाला. या अपघातात एक व्यक्ती जागीच मृत्यूमुखी पडला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी अपघातातील दोन्ही जखमींना रुग्णालयात नेण्यास मदत केली आणि पोलिसांना माहिती दिली.

घटना तेजस्वी नगरातील सागर हॉटेलच्या जवळ घडली. “प्रशांत” असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून तो संगोळ्ळी रायन्ना नगरातील रहिवासी होता. अपघातामध्ये अशोक लेलँड मिनी गोड्स वाहनाच्या पुढच्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे . अद्याप अपघातातील जखमी झालेल्या इतर दोन व्यक्तींची माहिती मिळालेली नाही .

स्थानिक पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आणि विद्यागिरी आणि संचार पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक तपास सुरू केला. प्रकरण नोंदवण्यात आले आहे

Tags: