भारतीय राजकारणाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरलेल्या , बेळगावमध्ये 1924 साली झ, महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी महोत्सव 26 आणि 27 डिसेंबर रोजी भव्यपणे साजरा करण्यात येईल, अशी माहिती एआयसीसी राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली.
आज बेळगाव येथील काँग्रेस कार्यलयात राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, रणदीपसिह सुरजेवाला , मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली आणि याबाबत माहिती दिली.
व्हॉइस ओव्हर : या वेळी एआयसीसी सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले, “आज आम्ही बेळगावमध्ये अभिमानाने आलो आहोत. 27 डिसेंबर 1924 रोजी महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन बेळगावमध्ये पार पडले होते. याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. हे प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यासाठी अभिमानास्पद आहे. महात्मा गांधीजींनी हिंसेविरुद्ध अहिंसेचा लढा दिला आणि प्रेम व समानतेचा संदेश दिला. आजही गरीब गरीबच राहतात आणि श्रीमंत श्रीमंतच राहतात.
आपण समानता, प्रेम आणि सौहार्दाबद्दल बोलतो. 26 डिसेंबरपासून बेळगावमध्ये ‘गांधी भारत’ कार्यक्रम सुरू होईल आणि ऐतिहासिक समारंभ आयोजित केला जाईल. भारताच्या राजकीय इतिहासात बेळगाव काँग्रेस अधिवेशनाची ऐतिहासिक भूमिका आहे. 26 डिसेंबर रोजी एआयसीसी कार्यकारणी सभा आणि 27 डिसेंबर रोजी भव्य काँग्रेस समारंभ होईल,” असे त्यांनी सांगितले
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, “26 डिसेंबर रोजी बेळगावच्या सुवर्ण सौधसमोर महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल. या कार्यक्रमाला एआयसीसी प्रमुख राहुल गांधी आणि एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहतील. तसेच सर्व पक्षाचे आमदार, खासदार आणि इतर जनप्रतिनिधींना पक्षाच्या पलीकडे जाऊन आमंत्रित केले आहे,” असे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेत मंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि इतर नेते उपस्थित होते.
Recent Comments