Belagavi

राज्यात गृहलक्ष्मी योजना अपयशी ठरलेली नाही…

Share

राज्यात गृहलक्ष्मी योजना अपयशी ठरलेली नाही, गृहलक्ष्मीच्या लाभार्थी महिला उद्या सुवर्णसौध पाहण्यासाठी येत आहेत, तसेच पंचमसाली आंदोलन कायद्याच्या मर्यादेत राहून व्हावे असे महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.

बेळगावमध्ये आज मिडिया प्रतिनिधींशी बोलताना, लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विरोधकांवर टीका केली. “विरोधकांनी गृहलक्ष्मी योजना अपयशी ठरल्याचा प्रचार केला असला तरी, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गृहलक्ष्मीची रक्कम महिलांच्या खात्यात जमा होत असते. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये भाजपाने आमच्या कर्नाटक मॉडेलची कॉपी केली आहे. त्या योजनेवर निवडणुका जिंकल्या आहेत. गृहलक्ष्मी योजनेमुळे अनेक महिलांना फायदा झाला आहे. सोशल मीडियावर ज्या महिलांनी त्यांच्या अनुभवांची माहिती शेअर केली आहे, त्या महिलांना नंतर सुवर्ण सौध भेटीचे आमंत्रण दिले आहे. त्याचवेळी त्यांच्याशी संवाद साधला जाईल,” असे त्याम्हणाली .

पंचमसाली आंदोलनावर भाष्य करताना, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले की, “आम्ही समाजाचा एक भाग आहोत आणि कोणत्याही व्यक्तीला हिंसा किंवा अवैध मार्गाने आपल्या हक्कासाठी लढा देण्याचा अधिकार नाही. आंदोलन कायद्याच्या मर्यादेत राहूनच व्हावे. हे आंदोलन दुसऱ्या पक्षांच्या किंवा प्रक्षोभक लोकांच्या दिशेने न जाऊ देणं गरजेचं आहे,” असं त्या म्हणाल्या.

आज त्यांनी बालभवन निर्मितीसाठी भूमिपूजन समारंभ केला आणि त्या आनंदी वातावरणात पत्रकारांशी बोलताना, “राजकीय प्रश्न विचारू नका,” असंही त्यांनी सांगितलं.

Tags: