Belagavi

कचरावाहू वाहन पडले. कालव्यात ..ड्रायव्हरला जलसमाधी

Share

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कचरा टाकणारे वाहन कालव्यात पडले व चालकाचा जागीच मृत्यू झाला.

बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातील मुनवल्ली शहराच्या हद्दीत पालिकेच्या कचरावाहू वाहनाचे नियंत्रण सुटून मलप्रभा नदीच्या डाव्या बाजूला असलेल्या बाळेकुंदर्गी कालव्यात पडून अपघात झाला.

या अपघातात कचरावाहू वाहनाचा चालक 48 वर्षीय गदिगेप्पा कामन्नवर याचा जागीच मृत्यू झाला, तर मदतनीस मंजुनाथ सिंगण्णा बचावला आहे. सवदत्ती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला

Tags: