Belagavi

सिद्धरामय्या यांना पाहिल्यावर वाईट वाटते : बी वाय विजयेंद्र

Share

सिद्धरामय्या यांना पाहिल्यावर वाईट वाटते , अय्यो असे वाटते असे भाजप प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांनी सांगितले .

आज बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यातील चांगली प्रगती म्हणजे त्यांचा सीबीआयवर विश्वास वाढला आहे. प्रियांक खर्गे आणि गृहमंत्री यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. पण सिद्धरामय्या याना बघताच मला खेद वाटतो .

“ते खूप प्रामाणिक आणि स्वच्छ हात असल्याचे सांगत होते, पण आता ते वाल्मीकी , अबकारी घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत. त्यांना यापासून कसे सुटावे हे समजत नाही. विधानसभेत मी प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्यास तयार आहे, जे सांगायचं असेल ते विधानसभेत सांगेल,” असे विजयेंद्र यांनी सांगितले.

Tags: