Belagavi

प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांचे निधन

Share

प्रसिद्ध प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन (७३) यांचे निधन झाले .  झाकीर हुसेन यांना हृदय संबंधित समस्या आल्यामुळे त्यांना अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हुसेन यांना रक्तदाबाचा त्रास होता असे समजले आहे. काही आठवड्यांपासून ते हृदयाशी संबंधित समस्यांमुळे त्रस्त होते. त्यामुळे त्यांना सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती त्यांच्या व्यवस्थापक निर्मला बाचानी यांनी दिली.

झाकीर हुसेन हे प्रसिद्ध संगीतकार होते आणि त्यांना १९८८ मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण आणि २०२३ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाले होते. ते उस्ताद अल्ला रखा खान यांचे पुत्र होते. भारत तसेच जगभरात त्यांनी आपली अनोखी छाप सोडली होती.

हुसेन यांनी त्यांच्या सातव्या वर्षी तबला वादन सुरू केले होते. १२ व्या वर्षीच त्यांनी भारतभर तबला सादरीकरण केले होते. बालपणापासूनच उस्ताद झाकीर हुसेन यांचा संगीत प्रवास सुरू झाला होता. त्यांनी आपला पहिला संगीत कार्यक्रम अमेरिकेत सादर केला होता. त्यांचा पहिला अल्बम ‘लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड’ १९७३ मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यांची अनोखी क्षमता अशी होती की, ते कोणत्याही पृष्ठभागावर लय निर्माण करण्याची कला शिकले होते. संगीताबरोबरच, तवा आणि थाली सारख्या स्वयंपाकघरातील वस्तूंनाही त्यांनी ताल साधण्यासाठी वापरून आपले कौशल्य दाखवले.

Tags: