Belagavi

केअर सेंटरमध्ये पाळीव कुत्र्याला त्रास दिल्याचा आरोप सत्यापासून दूर…

Share

हॅप्पी पेट्स केअर सेंटरमध्ये पाळीव कुत्र्याला त्रास दिल्याच्या प्रकरणाबाबत केअर सेंटरने स्पष्टीकरण दिले असून त्यांच्यावर करण्यात आलेला आरोप खोटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बेळगावच्या हिंदवाडी येथील हॅप्पी पेट्स विरुद्ध ज्योती कत्ती नावाच्या महिलेने तिच्या पाळीव कुत्र्याचा छळ केला आहे. कुत्र्याच्या पंजाला आणि पायाला दुखापत झाल्याची फिर्याद दिली होती . . मात्र,आम्ही सदर कुत्र्याची २ डॉक्टरांकडे तपासणी केली. त्यावेळी डॉक्टरांनी केलेल्या निदानानुसार त्या कुत्र्यांच्या पायाला आधीच दुखापत झाली होती . कुत्र्याचा पंजाला झालेली जखम ही सामान्य जखम असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामध्ये आमचा काहीही दोष नाही असे हॅपी पेट्स केअर सेंटरच्या रितू अरवाडे यांनी स्पष्ट केले . ज्योती कत्ती यांच्या कुत्र्याला त्रास दिल्याचा आरोप सत्यापासून दूर आहे असे त्यांनी सांगितले .

Tags: