Belagavi

मलगौडा पाटील यांनी केली गरीब विद्यार्थिनीला आर्थिक मदत

Share

सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय मलगौडा पाटील यांनी वडिलांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य देऊ केले आहे.

अगसगे येथील सिमरन आनंद कोलाकर या विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी अनेक आर्थिक अडचणी उद्भवल्या होत्या. हि बाब लक्षात घेत मलगौडा पाटील यांनी सदर विद्यार्थिनीला आर्थिक मदतीचा हात पुढे करत माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

बेळगाव तालुक्यातील आगसगे गावाच्या अंबेडकर गल्लीतील निवासी आनंद नरसु कोलकार यांचा अकाली मृत्यू झाला होता. आनंद कोलकार यांच्यापश्चात असलेल्या तीन अपत्यांपैकी सिमरन हि अतिशय हुशार विद्यार्थिनी आहे.

गरिबीमुळे आलेल्या आर्थिक अडचणींचा सामना करत शिक्षण घेणे सदर विद्यार्थिनीला शक्य नव्हते. सदर विद्यार्थीच्या शिक्षणात अडचण येऊ नये, यासाठी स्वतः तिच्या घरी जाऊन मलगौडा पाटील यांनी आर्थिक मदत दिली. तसेच, शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदतीची खात्री देत विद्यार्थिनीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

आनंद कोलकार हे मलगौडा पाटील यांचे जवळचे स्नेही होते. त्यांच्या जाण्यामुळे त्यांचे कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याचे लक्षात येताच मलगौडा पाटील यांनी सामाजिक बांधिलकी दर्शवत या कुटुंबालाही सहकार्य करून आधार दिला आहे.

ग्रा.पं. अध्यक्षा अमृता मुद्देनावर, सदस्य अप्प्या गौडा पाटील, पीकेपी एस सदस्य परशुराम रेडेकर, निंगाप्पा कोलकारा, अप्प्या कोलकार, संतोष मेत्री, रंजना कोलकार, मसनव्वा कोलकार आदींच्या उपस्थितीत कोलकार यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.

Tags: