बेळगावच्या महिला विद्यालय मंडळाच्या इंग्रजी माध्यम शाळेने ‘बेळगाव शहर ओळखा’ या विषयावर मॉडेल प्रदर्शन आयोजित केले होते .

या प्रदर्शनात बेळगाव शहरातील प्रमुख स्थळांच्या आणि पर्यटनस्थळांच्या प्रतिकृती मुलांनी तयार केल्या होत्या . विद्यार्थ्यांनी एमएलआरआयसी, सुवर्णसौध, रामकृष्ण मिशन आश्रम, मिलिटरी महादेव मंदिर, सांब्रा एअरपोर्ट, राजहंसगड किल्ला, किल्ला श्री दुर्गादेवी मंदिर, कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल इत्यादीची मॉडेल्स आकर्षक पद्धतीने तयार केली होती.

हे प्रदर्शन , १२ ते १४ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले होते . . शाळेच्या अध्यक्षा डॉ. शोभा शानभाग आणि सचिव विवेक कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ही प्रदर्शनी आयोजित केली गेली.

एमपीएम इंग्रजी माध्यम शाळेचे विद्यार्थीही या मॉडेल्स तयार करण्यामध्ये सहभागी झाले होते. शाळेच्या प्राचार्य कवीता पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी ही सर्व मॉडेल्स तयार केले होते. मुलांची प्रतिभा आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यात आले आणि त्याचे कौतुक करण्यात आले.


Recent Comments