बेळगावमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात फक्त राजकीय हितसंबंधांवर चर्चा होत आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा होत नाही, असे म्हणत कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हसिरू सेना राज्याध्यक्ष चुनाप्पा पुजारी यांनी सरकारविरोधात तीव्र विरोध दर्शवला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यात काल झालेल्या बसवेश्वर जलसिंचन मुद्द्यावर झालेल्या आंदोलनात भाग घेणाऱ्या चुनाप्पा पुजारी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘शेतकऱ्यांना उपयुक्त अशी बसवेश्वर जलसिंचन योजना विलंबित आहे, यामागे अनेक अज्ञात हात आहेत. सरकारच्या पैशावर भ्रष्टाचार झाला आहे, आणि शेतकऱ्यांच्या मागण्यां पूर्ण व्हायला हव्या . ते म्हणाले की, ‘यापुढे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन केलं जाईल.’
अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा होईल अशी आशा आहे. वेळ वाया घालवून फुकट चर्चा करणं बंद करा, शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करा.’ राज्यात ऊस उत्पादक शेतकरी गंभीर संकटात आहेत, प्रत्येक टनाला पाच हजार रुपये FRP दर निश्चित करायला हवा अशी मागणी चुनाप्पा पुजारी यांनी केली. या संदर्भात १६ डिसेंबर रोजी एक लाख शेतकरी बेळगावच्या सुवर्णसौध समोर आंदोलनात सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारने लवकरच प्रत्येक टनासाठी पाच हजार रुपये दर निशचित करावा, अशी त्यांची मागणी होती.
Recent Comments