बेळगाव येथे पंचमसाली आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या विरोधात सिंदगी तालुक्यातील गोलगेरी गावात लिंगायत समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील गोलगेरी गावात पंचमसाली समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन झाले. कर्नाटक रक्षण वेदिकेचे उत्तर कर्नाटक अध्यक्ष संतोष पाटील डंबळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलनकर्त्यांनी रस्ते अडवून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि आपला रोष व्यक्त केला. आंदोलकांनी रस्त्यावर टायर पेटवून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली.
सरकारच्या धोरणांवर आणि आंदोलनकर्त्यांवरील लाठीमारावर तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव परिस्थिती नियंत्रणात आणली.


Recent Comments