Vijayapura

पंचमसाली आंदोलकांवर लाठीचार्ज: विजयपूर जिल्ह्यात तीव्र निषेध

Share

पंचमसाली 2A आरक्षणाच्या आंदोलनात , आंदोलकर्त्यांवर लाठी चार्ज करण्यात आला. लाठी चार्जमुळे सध्या सरकार अडचणीत सापडलं आहे. लाठी चार्ज प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे . आंदोलनाचे प्रमुख आ . बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्याच मतदार संघात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला .

लिंगायत पंचमसाळींना 2A आरक्षणाच्या मागणीसाठी पंचमसाली समाजाने मंगळवारी सुवर्णसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न केला . सुवर्ण सौधला घेराव घालण्यासाठी निघालेल्या पंचमसाली संघर्षाला हिंसक वळण लागले आणि पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. सुवर्णसौधला घेराव घालण्यासाठी आलेल्या आंदोलकांना पोलिसांनी वाटेत अडवले. यावेळी धक्काबुक्की झाली. यावेळी पोलिसांवर चप्पल आणि दगडफेक झाली . दगडफेकीमुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला.

या घटनेबद्दल विजयपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त होत आहे. मुद्देबिहाळचे माजी आमदार ए.एस. पाटील नडहळ्ळी यांनी सांगितले, राणी चन्नम्मा वंशाच्या पंचमसाली लिंगायत समाजाच्या शांततामय आंदोलनावर काँग्रेस सरकारने केलेला अमानुष लाठी चार्ज अत्यंत निषेधार्ह आहे. पोलिस स्टेशनला आग लावणाऱ्यांना, हॉटेल्समध्ये बॉम्ब स्फोट करणाऱ्यांना काँग्रेस सरकार मदत करते, पण शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या पंचमसाली समाजावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, हे समाजासाठी अपमानास्पद आहे.

माजी मंत्री मुरुगेश निराणी यांनीही या घटनेवर तीव्र निषेध व्यक्त केला. ते म्हणाले, “सरकारने आंदोलकांना समजावण्याऐवजी लाठी चार्ज केला आणि हिटलरशाही धोरणं स्वीकारले . निष्पाप आंदोलक गंभीर जखमी झाले आहेत. आमच्या भाजप सरकारच्या काळात, आम्ही कधीही आंदोलकांवर बलप्रयोग केला नाही. पण सिद्दरामय्या यांच्या काँग्रेस सरकारने निष्पाप आंदोलकांवर अत्याचार केले आहेत. पंचमसाली समाज काँग्रेसला योग्य धडा शिकवेल.”

एकंदरीत, विजयपूर जिल्ह्यात लाठी चार्जविरोधात तीव्र निषेध व्यक्त होत आहे. याशिवाय सरकार लाठी चार्ज करून अडचणीत सापडलं आहे.

Tags: