पंचमसाली आंदोलकांकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने परिस्थिती ताणली गेली आणि पोलिसांना बळाचा वापर करावा लागला . असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले.
बेळगावात मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी, आयजीपी, शहर पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. दोन दिवसांपूर्वी पंचमसाली आरक्षणाचे अर्ज आले असता त्यांना जिल्हा प्रशासनाकडून काही सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या, परंतु आंदोलकांनी त्याचे उल्लंघन केले. जिल्हा प्रशासनाने त्यांना
दिलेल्या सूचनांचे पालन करणे अपेक्षित होते. पंचमसाली लिंगायत समाजाला बेळगावच्या सुवर्ण विधानसौध समोर शांततेत आंदोलन करण्याचे आदेश होते, पण त्यांनी ट्रॅक्टर रॅली घेण्याचा निर्णय घेतला. यावर हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन झाले, मात्र आंदोलकांनी त्याचे उल्लंघन केले. आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले. कायदा व सुव्यवस्था राखणे हे जिल्हा प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
आयजीपी विकास कुमार यांनी देखील सांगितले की:सुवर्ण विधान सौधाच्या कोंडुसकोप्पजवळ पंचमसाळी अधिवेशन आरक्षण संघर्ष आंदोलनादरम्यान आम्ही न्यायालयाच्या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्था राखली आहे.ट्रॅक्टर रॅली काढणार म्हटल्यावर पंचमसाली नेत्यांना फोनवर बोलावण्यात आले हे खरे आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन हे चुकीचे होते. असे आयजीपी म्हणाले .
पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांनी सांगितले की: “कायदा आणि सुव्यवस्था राखणे पोलिसांचे कर्तव्य आहे. आंदोलकांनी बेळगावच्या सुवर्ण विधानसौध समोर शांततेत आंदोलन करण्याचे मान्य केले होते, सुवर्णसौध समोरील राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आम्ही दहा जणांना परवानगी दिली होती पण ते सुमारे दहा हजार लोकांसह बाहेर पडले.
त्यानंतर अचानक झालेल्या दगडफेकीत १४ पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत . या घटनेत 70 ते 80 जणांना ताब्यात घेऊन आम्ही हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहोत. या घटनेत आमच्या पोलिस विभागाच्या वाहनासह परिवहनच्या चार बसेसचे दगडफेकीत नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद उपस्थित होते .


Recent Comments