Belagavi

आम्ही चर्चेसाठी बोलावले पण पंचमसाली आले नाहीत : सीमावाद संपला; बेळगावचा महाराष्ट्रात समावेश हा मूर्खपणा – मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Share

लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आज आम्ही पंचमसाली आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले. मात्र ते आले नसल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

सुवर्णसौधच्या पायरीवर आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आज आम्ही 2ए आरक्षणाबाबत पंचमसाली नेत्यांना चर्चेसाठी बोलावले पण ते आले नाहीत. आता सभागृह तहकूब करण्यात आले आहे आणि आम्ही आता एस एम कृष्णा यांच्या अंत्यसंस्कारासाठी निघालो आहोत. आमचा कोणत्याही आंदोलनाला विरोध नाही. असे मुख्यमंत्री म्हणाले .

यावेळी त्यांनी , सीमावाद प्रकरणाचा शेवट आहे. महाजन आयोगाचा अहवाल अंतिम आहे. बेळगावचा महाराष्ट्रात समावेश करायचा हा मूर्खपणा आहे. वारंवार गाजत असलेला हा मुद्दा आपण सहन करणार नाही, असे ते म्हणाले.

Tags: