बेळगाव अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते महामेळाव्याचे आयोजन करत असताना, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. बेळगावमधील धर्मवीर छत्रपती संभाजी चौकात या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बेळगाव कारवार, निपाणी, बीदर, भाल्की अशा घोषणा देत आलेल्या २५ हून अधिक एम.ई.एस. कार्यकर्ते आणि नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एम.ई.एस.च्या महामेळाव्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले असून, काही ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
यावर मिडियाशी संवाद साधताना, एम.ई.एस. नेते रमाकांत कोंडूस्कर यांनी सांगितले की, बेळगावात लोकशाही लोप पावत चालली आहे. ते म्हणाले की, स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांवरील अन्यायाच्या विरोधात हक्क मिळवण्यासाठी लढायला देखील सरकार मोकळीक देत नाही.

याचप्रमाणे, एम.ई.एस. चे माजी आमदार मनोहर किणेकऱ यांनी सांगितले की, बेळगावबाबत कर्नाटक सरकारची चिंता 2006 मध्ये जेव्हा सीमावाद वाढला तेव्हापासून सुरू झाली . 1956 पासून बेळगावात अधिवेशन का आयोजित केले नाही. असा प्रश्न त्यांनी केला . आपला हक्क सांगण्यासाठीच हे अधिवेशन बेळगावात आयोजित केले जात असल्याचे ते म्हणाले .
तसेच, रणजीत चव्हाण पाटील यांनी सांगितले की, सरकार कोणतेही असो, सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे. एम.ई.एस. नेता आर.एम. चौगुले यांनी देखील सांगितले की, सरकार मराठी भाषिकांना प्रजातंत्राच्या मार्गाने निषेध व्यक्त करण्याची संधी देत नाही.


Recent Comments