बीम्स रुग्णालयातील अर्भक आणि बाळंतिणीच्या मृत्यूबाबत सरकारला , सरकारी रुग्णालयांची चिंता नाही. तसेच आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनादेखील चिंता नाही असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांनी सांगितले.
बेळगाव येथील बिम्स रूग्णालयात शिशु आणि प्रसूत महिलांच्या मृत्यूसंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांनी भेट दिली. याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी यापूर्वीच बोलून दाखवले आहे. बल्लारीमध्ये 6 माता आणि शिशुना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्य सरकारचा बेजबाबदारपणा सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे याबाबतची संपूर्ण सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही हॉस्पिटलला भेट दिली. यात राजकारणाचा प्रश्नच येत नाही. आज गरिबांवर अन्याय होत आहे.

सरकारी दवाखान्यात जाणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून जीव गमवावा लागत आहे. आम्ही येथे सत्य समजून घेण्यासाठी आलो आहोत. यावर आपण सभागृहात चर्चा करू. आरोग्यमंत्री, जिल्हा प्रभारी मंत्र्यांसह कोणीही याकडे लक्ष देत नसल्याचे ते म्हणाले. वैद्यकीय मंत्री शरण प्रकाश पाटील हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जात नाहीत. सरकारने बेजबाबदारपणा थांबवून या प्रश्नावर तातडीने लक्ष केंद्रित करावे. त्या दृष्टिकोनातून आम्ही आग्रही आहोत.
बल्लारी आणि बेळगावमध्ये प्रसूत महिला आणि नवजात बालके मृत्यूमुखी पडत आहेत, ही विडंबना आहे. सरकारला सरकारी रुग्णालयाची चिंता नाही, यावर सभागृहात चर्चा करू, असे ते म्हणाले. दरवर्षी मृत्यू होतात या मंत्री गुंडू राव यांच्या वक्तव्याला उत्तर देताना ते म्हणाले की, यात आम्ही राजकारण करत नाही. मंत्र्यांनी सरकारी रुग्णालयांवर लक्ष केंद्रित करावे. जेव्हा मृत्यू आणि दु:ख असेल तेव्हा विरोधी पक्ष जबाबदारी घेतील, असे ते म्हणाले.


Recent Comments