Vijayapura

तुर पीक नुकसान भरपाईसाठी उद्या तालिकोटे येथे भव्य आंदोलन: ए.एस. पाटील नडहळ्ळी

Share

सरकारने निकृष्ट दर्जाचे तुर बियाणे वितरित केल्याने , लाखो हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून, हजारो कोटी रुपयांचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. यावरून काँग्रेस सरकारच्या निष्क्रियतेवर भाजपच्या शेतकरी मोर्चा अध्यक्ष ए.एस. पाटील नडहळ्ळी यांनी तीव्र शब्दात टीका केली.

विजयपूर शहरात माध्यमांशी बोलताना ए.एस. पाटील नडहळ्ळी म्हणाले की, “आधीच तालुका आणि होबळी स्तरावर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात ९ डिसेंबर रोजी तालिकोटे येथे मोठं आंदोलन करण्यात येणार आहे. १० डिसेंबर रोजी प्रत्येक गावातून तुर उत्पादक शेतकऱ्यांनी लोकायुक्ताकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर, जर परिस्थिती सुधारली नाही, तर जिल्हाधिकारी आणि कृषी सहसंचालक यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल,” असं ते म्हणाले.

राज्य सरकारने शेतकरी कल्याणासाठी जे योजना लागू केल्या होत्या, त्या स्थगित करण्यात आल्या आहेत. उत्तर कर्नाटकमध्ये तुर पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. बीदर, कलबुर्गी, रायचूर, कोप्पल, यादगिरी, विजयपूर आणि बागलकोटे जिल्ह्यात तुर पिकाचे क्षेत्र वाढले आहे. कलबुर्गीमध्ये ६.१३ लाख हेक्टर क्षेत्रावर तुर लागवडीला प्राथमिक स्थान मिळाले असून, विजयपूरात ५.३४ लाख हेक्टर क्षेत्रावर तुर लागवडीचे प्रमाण आहे,” असे ए.एस. पाटील नडहाळी यांनी सांगितले.

तथापि, उत्तर कर्नाटकमध्ये तुर पिकाला कुठेही चांगले पीक मिळाले नाही. रोपे उंच वाढलेली आहेत मात्र फळधारणा झालेली नाही . यामागील मुख्य कारण म्हणजे, सरकारने वितरित केलेल्या खराब गुणवत्तेचे बियाणे होय .

*शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणे आणि दोषींवर कारवाई करणे यासाठी भाजपा शेतकरी मोर्चाने तीव्र आंदोलन छेडले आहे. याव्यतिरिक्त, शेतकरी मोर्चाचे सदस्य , बेळगाव येथे होणाऱ्या अधिवेशनात या मुद्द्यावर ठोस निर्णय घेण्याची मागणी करत आहेत. जर सरकारने योग्य उपाययोजना केली नाही, तर हे आंदोलन राज्यभरात विस्तारित केले जाईल,” असे ए.एस. पाटील नडहाळी यांनी सांगितले.

संपूर्ण पत्रकार परिषदेत शेतकरी मोर्चा जिल्हाध्यक्ष गुरुलिंगप्पा अंगडी आणि इतर नेते उपस्थित होते.

Tags: