Chikkodi

एकसंबा -दानवाड रस्त्यासाठी 2 कोटी रुपयांचे अनुदान : आमदार प्रकाश हुक्केरी

Share

चिक्कोडीतील एकसंबा – दानवाड रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी रु. अनुदान मंजूर करण्यात आले आहे असे दिल्ली सरकारचे विशेष प्रतिनिधी आणि विधान परिषदेचे सदस्य प्रकाश हुक्केरी म्हणाले .

एकसंबा – दानवाड रस्त्यावरील गणेश मंदिराजवळ रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांनी हा रस्ता दुरुस्त करण्याबाबत माझ्या व आमदार गणेश हुक्केरी यांच्या निदर्शनास आणून दिले असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन त्यांना रस्ता दुरुस्तीची जाणीव करून दिली. या संदर्भात त्यांनी दोन कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी नगर पंचायत अध्यक्ष सुनिल सप्तसागर, पंकज पवार, विनोद चितळे , राजेंद्र कराळे, मारुती माने, सुभाष कल्याणी, गजानन हुक्केरी, मारुती हवालदार, संजू देसाई, अजित गिरगावे, राजू बागेवाडी, अजित , रोहित सतवार, किरण केसे, गजानन काळे, कंत्राटदार रवी माळी, नगरपंचायतीचे सर्व सदस्य, शेतकरी आदी उपस्थित होते.

Tags: