तृणधान्य आणि सेंद्रिय पदार्थ आंतरराष्ट्रीय वाणिज्य मेळावा 2025 च्या निमित्ताने जिल्हास्तरीय तृणधान्य आणि सेंद्रिय पदार्थांची पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .
बेळगाव शहरातील जिल्हा संयुक्त संचालकांच्या कार्यालयाच्या परिसरातील के.एस.एस.सी. हॉलमध्ये तृणधान्य आणि सेंद्रिय पदार्थांची पाककला स्पर्धा पार पडली . या कार्यक्रमाचे अध्यक्षपद जिल्हा संयुक्त संचालक शिवनगौड एस. पाटील यांनी भूषवले .

त्यांनी या वेळी बोलताना म्हटले की, “आधुनिक जीवनशैलीमुळे शुगर , उच्च रक्तदाब, वजन वाढणे इत्यादी समस्या जास्त होतात. यावर मात करण्यासाठी तृणधान्य आणि सेंद्रिय पदार्थ वापरणे अत्यंत आवश्यक आहे. तृणधान्य ही पोषणतत्त्वांनी समृद्ध असतात आणि शरीराच्या संतुलित आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. या प्रकारच्या आहाराच्या फायद्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी अशा स्पर्धा अत्यंत उपयुक्त ठरतात. सरकार तृणधान्य आणि सेंद्रिय शेतीला सर्व प्रकारे प्रोत्साहन देत आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी विशेष भू-स्वाधीन अधिकारी राजश्री जैनापूर म्हणाल्या कि , “पारंपरिक आहार पद्धती लोप पावत आहेत आणि ते लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. पारंपरिक आहार पद्धतींचे पोषणतत्त्व आणि त्यांचे फायदे आगामी पिढीला सांगणे आणि त्या परंपरेला पुढे नेणे अत्यंत आवश्यक आहे.” डॉ. संजीव टोंणे, रेखा कारभारी, गीता हिरेमठ आदींनी पाककला स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले .

या पाकस्पर्धेत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून 80 स्पर्धकांनी भाग घेतला. तृणधान्य आधारित खाद्यपदार्थाच्या विभागात प्रथम स्थान रूपांज भोसले, द्वितीय स्थान वीणा गजरे यांनी आणि तृतीय स्थान भावना किट्टूरकर यांनी प्राप्त केले . तसेच,तृणधान्य सहाय्यक खाद्य विभागात प्रथम स्थान अनिता जोडट्टी, द्वितीय स्थान वैष्णवी हेबसूर आणि तृतीय स्थान पूजा पाटील यांनी प्राप्त केले .


Recent Comments