बेळगावमधील लिंगायत समाजाने विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या विरोधात मोठा निषेध मोर्चा कडून आंदोलन केले . यत्नाळ यांनी विश्वगुरू बसवन्ना यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर लिंगायत समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
शुक्रवारी बेळगावमधील लिंगायत समाजाने विजयपूरचे आ . यत्नाळ यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी आ . यत्नाळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. मात्र पोलिसांनी याला अटकाव केला .

सत्यदेवी माताजी यांनी यावेळी सांगितले कि , बसवण्णा यांच्या तत्त्वज्ञानाला संपूर्ण जगाने मान्यता दिली आहे. त्यावर यत्नाळ यांनी अशोभनीय टिप्पणी केली आहे. त्यांनी बसवन्ना बाबत अशा प्रकारे बोलून लिंगायत समाजाला अपमानित केले आहे. यत्नाळ यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अन्यथा , आम्ही तीव्र आंदोलन करू. असा इशारा दिला .
यत्नाळ हे हवे तिथे येण्याची धमकी देत आहेत. जर त्यांना बोलायचं असेल तर त्यांनी बेळगावला यायला हवं. सरकारने बसवेश्वरांना सांस्कृतिक नेते म्हणून घोषित केले होते, पण आता त्यांना अपमानित केलं गेलं आहे. सरकारने यत्नाळ विरोधात त्वरित कारवाई केली पाहिजे. पण आता त्यांचा अपमान झाला आहे.

सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांना आमदार पदावरून बडतर्फ करण्यात यावे. सर्व बाबतीत हलके बोलणाऱ्या यत्नाळ यांचे तोंड बंद करावे. शिवलिंग न घालणाऱ्या यत्नाळ याना बसवण्णांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही.
या आंदोलनात शेकडो लिंगायत बंधू-भगिनी सहभागी झाले होते.


Recent Comments