Athani

अथणीत एएसआयची गळफास घेऊन आत्महत्या

Share

अथणी तालुक्यातील ऐगळी पोलीस ठाण्याच्या एएसआयने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील अनंतपूर या त्यांच्या मूळ गावी त्यांनी राहत्या घरी गळफास लावून घेतला.

शंभू मेत्री (50) असे आत्महत्या केलेल्या ASI चे नाव आहे. ते अथणी तालुक्यातील ऐगळी पोलीस ठाण्यात एएसआय म्हणून कार्यरत होते .

गेल्या अनेक महिन्यांपासून शंभू आजारी होते . त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु आहे .

Tags: