Crime

प्रेमविवाहस विरोध केल्याने , प्रियकराकडून प्रेयसीची आई आणि भावाचा निर्घृण खून

Share

बेळगाव जिल्ह्याच्या निपाणी तालुक्यातील अकोळ गावामध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण निपाणी तालुका हादरून गेला आहे.प्रेम विवाह करण्यासाठी नकार दिल्याने, प्रियकराने प्रेयसीची आई आणि तिच्या भावाचा निर्घृण खून केला आहे .

या घटनेबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार अकोळ गावच्या रवी आणि प्राजक्ता हे एकाच समाजातील असून त्यांच्या प्रेमविवाहाला प्राजक्ताची आई आणि भावाचा विरोध होता त्यामुळे रागाच्या भरात काल रात्री रवीने घरात एकटाच घुसून प्राजक्ताची आई मंगल नाईक (४५) आणि प्राजक्ताचा भाऊ प्रज्वल नाईक (१८) यांचा कोयत्याने वार करून निर्घृण खून केला .

याप्रकरणी बेळगाव जिल्ह्यातील निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी रवी आणि त्याची प्रेयसी प्राजक्ता यांना अटक केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी निपाणी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Tags: