Belagavi

नावगे : वेगावरील नियंत्रण सुटल्याने बस पलटली! सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Share

बेळगाव तालुक्यातील नांवगे गावाजवळ वेगावरील नियंत्रण सुटल्याने केएसआरटीसी बस पलटल्याची घटना घडली असून बसमध्ये केवळ चारच प्रवासी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

नांवगे गावाजवळ आज पहाटे एका केएसआरटीसी बसचा वेगावरील ताबा सुटल्याने ती थेट कड्यावरून खाली जाऊन पलटली. नांवगे गावातून बेळगावकडे जात असताना ही घटना घडली. या बसमध्ये केवळ चार प्रवासी प्रवास करत होते, त्यामुळे मोठा अपघात टळला.

अपघातामध्ये बसचे मोठे नुकसान झाले असून प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Tags: