Belagavi

आंबेडकर सर्कल फलक हटवल्याने दलित आंदोलकांचे आंदोलन

Share

बेळगावच्या कॅम्प परिसरात रात्री उशिरा बसवण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्कल फलक हटवण्याच्या धोरणाविरोधात दलित संघटनांनी आज आंदोलन केले.

बेळगाव येथील कॅम्प परिसरात रात्री उशिरा आंबेडकर सर्कलचे पोस्टर हटविल्याप्रकरणी दलित संघटनेतर्फे आज आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणा देत आंदोलकांनी आपला रोष व्यक्त केला.

यावेळी बोलताना , दलित नेत्यांनी सांगितले कि , छावणी परिषदेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्कल बांधण्याची विनंती गेली ५ वर्षे केली पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर काल डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्कल म्हणून लावण्यात आलेला नामफलक हटवण्यात आला .

या धोरणाचा आम्ही निषेध करतो. फलक काढणाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी पोलिसांनी आंदोलक दलित संघटनेच्या नेत्यांना ताब्यात घेतले.

Tags: