Uncategorized

50 लाखाच्या इन्शुरन्स रकमेसाठी भावानेच केला भावाचा खून

Share

बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यातील कल्लोळी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यात एका भावाने आपल्या भावाचा इन्शुरन्सच्या रक्कमेच्या हव्यासापोटी केला आहे. या खुनातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बसवराज तळवार यांनी आपल्या मोठ्या भावाच्या नावावर 50 लाख रुपयांचे इन्शुरन्स केले होते.आपला भावाचे निधन झाले तर इन्शुरन्सची रक्कम आपल्याला मिळेल, या हव्यासापोटी त्याने आपल्या भावाला फसवून त्याला विषारी पदार्थ देत अज्ञात ठिकाणी नेऊन बापू शेख, ईरप्पा हडगिनाळ, सचिन कंठेन्नवर या आपल्या साथीदारांसोबत भावाचा लोखंडी रॉडने मारून खून केला.

या खुनानंतर, चार आरोपी कल्लोळी गावातून फरार झाले होते. परंतु घटप्रभा पोलिसांनी मोबाईल टॉवर लोकेशनच्या मदतीने तपास घेत सर्व आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांना धक्का बसला असून पोलिसांनी खुनाचे कारण आणि आरोपींचे कृत्य याबाबत सखोल तपास सुरू ठेवला आहे.

Tags: