khanapur

खानापूर : कुप्पटगिरीतील श्री भावकेश्वरी मंदीराच्या जीर्णोद्धार कार्याची सुरुवात

Share

खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी येथील श्री भावकेश्वरी मंदीराच्या जीर्णोद्धार कार्याची सुरुवात झाली असून, या कार्याचा शुभारंभ लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कुप्पटगिरी येथील श्री भावकेश्वरी मंदीराच्या जीर्णोद्धारासाठी मंदीर विकास समिती, पंच समिती आणि ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे. मंदीरासाठी स्लॅब भरणी कार्य नुकतेच पार पडले. लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात सदानंद पाटील यांनी सदर मंदिर आणि परिसराचा पर्यटन स्थळ या अनुषंगाने विकास करण्याचा आमदार विठ्ठल हलगेकर यांचा मानस असल्याचे सांगितले.

आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधीचा वापर करण्यात येणार आहे. या मंदीराच्या जीर्णोद्धारासाठी एकूण १.५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यातील ३० टक्के निधी ग्रामस्थांच्या सहकार्याने तर उर्वरित ७० टक्के निधी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रयत्नातून आणि लैला शुगर्सच्या सहकार्याने उभारला जाईल.

कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी मंदीर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष शंकर बळराम पाटील, भाजपचे नेते धनंजय जाधव, चांगप्पा निलजकर, मंदीर जीर्णोद्धार समितीचे सदस्य, पंच मंडळ, ग्रामस्थ आणि महिला आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. शंकर बळराम पाटील यांनी कार्यकमाचे आयोजन केले, नमंत विष्णू पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Tags: