khanapur

खानापूर: अपुऱ्या बससेवेविरोधात करवेचे आंदोलन

Share

खानापूर तालुक्यात बस सेवा उपलब्ध नसल्याने कर्नाटक रक्षण वेदिकेने तीव्र आंदोलन सुरू केले आहे. विशेषतः दुर्गम भागात बस सेवा मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून असून परिस्थिती सुधारली नाही, तर उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

खानापूर येथील विविध गावांना बस सेवा मिळवण्यासाठी कर्नाटक रक्षण वेदिकेने बसवेश्वर चौकापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत भव्य रॅली आयोजित केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्राथमिकत: बस सेवा पुरविली हवी अशी मागणी केली.

कर्नाटक रक्षण वेदिकेचे अध्यक्ष पांडुरंग गुळन्नवर आणि जिल्हाध्यक्ष बसवराज तुंबरे यांनी बोलताना सांगितले कि, येथील जनतेला विशेषतः शालेय विद्यार्थी आणि कामानिमित्त जाणाऱ्या लोकांना बसच्या अपुऱ्या सुविधेमुळे मोठा त्रास होतो आहे. अत्यंत दुर्गम भागात राहणाऱ्यांना तासन्तास बसची प्रतीक्षा करावी लागते. यापूर्वीही बऱ्याच वेळा प्रशासनाला या बाबत तक्रारी केल्या, मात्र त्यावर ठोस कृती करण्यात आलेली नाही. जर प्रशासनाने त्वरित योग्य उपाययोजना केल्या नाहीत, तर तालुक्यात ‘बंद’ चा इशारा दिला जाईल,” असा इशारा यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात कर्नाटक रक्षण वेदिकेचे सदस्य, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या
संख्येने सहभागी झाले होते.

Tags: