गोकाकमध्ये पोलीस ठाण्याच्या समोरच मद्यप्राशन करणारा आरोपी सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
गोकाक शहरातील पोलीस ठाण्याच्या समोरच एक आरोपी नद्याजवळ बसून मद्यप्राशन करत होता. पोलीस, नागरिकांना न जुमानता खुलेआम असंवेदनशीलतेने मद्यप्राशन करणाऱ्या सदर व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
या घटनेमुळे पोलिसांची कार्यक्षमता आणि कायद्याचे पालन या संदर्भात प्रश्न उपस्थित झाले असून या घटनेवर पोलिस प्रशासन काय कारवाई करेल, हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.
Recent Comments