कर्ज वसुलीच्या तगाद्यामुळे हताश होऊन एका कामगाराने सेल्फी व्हिडीओ करून आत्महत्या केल्याचा प्रकार रायबाग तालुक्यातील दिग्गेवाडी गावात घडला.
रायबाग तालुक्यातील दिग्गेवाडी गावात अप्पासाब कंबार नावाच्या व्यक्तीने ५०,००० रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाचे व्याज वाढल्याने कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात आला होता. याला कंटाळून सदर व्यक्तीने सेल्फी व्हिडीओ करून आत्महत्येचा निर्णय घेतला. त्यात त्याने रेखा समगार आणि भीमू वाळके यांचे नाव घेतले असून या दोघांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावल्याने तसेच अधिक व्याजाची आकारणी करत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले.
माझ्या मृत्यूला हे दोघेच कारणीभूत आहेत, इतरांना त्रास देऊ नका. असे त्याने मृत्यूपूर्वी सांगितले आहे. मृत अप्पासाब एक खाजगी क्रशरमध्ये सुरक्षा गार्ड म्हणून काम करत होता. रायबाग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरण नोंदवले आहे आणि आरोपींना अटक केली आहे.
Recent Comments