Belagavi

राष्ट्रीय एसजीएफआय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंचे यश

Share

राजकोट येथे झालेल्या 68व्या राष्ट्रीय एसजीएफआय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा आणि हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी राज्यासाठी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी पदके मिळवून कर्तृत्व सिद्ध केले आहे.

बेळगावच्या आबा आणि हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी 68व्या राष्ट्रीय एसजीएफआय जलतरण स्पर्धेत भरीव कामगिरी केली. बेळगावच्या जलतरणपटूंनी आपल्या कामगिरीने कर्नाटक राज्याचा सन्मान उंचावला असून कुमार स्वरूप सतीश धनुचे यांनी कर्नाटकचे प्रतिनिधित्व करताना सुवर्ण आणि रौप्य अशा तीन पदकांची कमाई केली. तसेच तनुज राकेश सिंग यांनी रौप्य आणि युवराज संतोष मोहनगेकर यांनी कांस्य पदक मिळवले आहे.

या यशामागे त्यांचे प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, शिवराज मोहिते आणि रणजित पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. या जलतरणपटूंनी आपल्या अथक परिश्रमाने आणि उत्कृष्ट कामगिरीने राष्ट्रीय स्तरावर राज्याचे नाव उज्ज्वल केले असून बेळगाव जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.

Tags: