Belagavi

सोशल मीडियावर मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याविषयी अवमानकारक टिप्पणी करणारा आरोपी अटक

Share

सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावर सोशल मीडियावर अवमानजनक भाषा वापरणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला तुमकूरमधून अटक करून बेळगाव कोर्टात हजर करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याविरोधात निंदनीय आणि अवमानजनक भाषेत टिप्पणी करणाऱ्या मोहित नरसिंहमुर्ती (38) या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात बेळगावच्या मार्केट पोलिस ठाण्यात मंत्री सतीश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय विजय तळवाळ यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मार्केट पोलिसांनी तपास करत आरोपीला तुमकूर येथे शोधून काढत अटक केली. त्यानंतर आरोपीला बेळगाव येथे आणून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे सोशल मीडियावरील बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या नेटकऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे. पोलिसांची कठोर भूमिका इतर बेजबाबदार नेटकऱ्यांसाठीही एक धडा ठरली आहे.

Tags: