कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या वीर जवानाला शासकीय सन्मानाने देशनूर गावात अंतिम निरोप देण्यात आला. कुटुंबीयांसह माजी सैनिक आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले.
बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील देशनूर गावचे वीर जवान राजू महादेव कडकोळ यांचे 115 व्या इन्फंट्री बटालियनमध्ये सेवा बजावताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. वीर जवानाचे पार्थिव शासकीय सन्मानाने देशनूर गावात आणण्यात आले. गावकऱ्यांच्या उपस्थितीत अंत्ययात्रा काढून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीयांचा हृदयद्रावक आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. यावेळी माजी सैनिक संघाचे सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे जवानाच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि योग्य सन्मान मिळावा, अशी मागणी केली आहे.
Recent Comments